तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे

0
8

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयने तावडेंची पुन्हा 4 दिवसाची सीबीआय कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने सीबीआयची मागणी फेटाळून लावली. तावडेची पत्नी विदेशातून आज भारतात येणार आहे त्यामुळे त्यांची संयुक्तिक चौकशी करायची आहे. तसेच तावडे चौकशीला सहकार्य करीत नसल्याने 4 दिवसाची सीबीआय कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआयने केली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली.
दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तावडेच्या ताब्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केला. त्यानंतर कोर्टाने पानसरे हत्या प्रकरणी चौकशीसाठी तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, आज दाभोलकर यांच्या हत्येला 34 महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंनिस व पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निषेध मोर्चा काढला व निदर्शने केली. यावेळी सनातन संस्थेवर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी केली.