अभिषेक कृष्णा नाशिक महापालिकेचे आय़ुक्त

0
11

पुणे- शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जीवन वाहीनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)चे जून 2015 मध्ये कारभार स्विकारणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.या अकरा महिन्यांच्या कालावधीत पीएमपीच्या प्रशासकीय कामकाजात सुसुत्रता, अधिकाधिक पेपरलेस कारभार, सर्व बसेसला जीपीएस,पीएमपीच्या संकेतस्थळाचे नुतनीकरण ,अत्याधुनिक तक्रार निवारण प्रणाली, सुमारे 500 बस खरेदीचा निर्णय झाली. 3 हजार हून अधिक पद भरतीचा निर्णय असे विविध निर्णय घेतले असून या वर्षभराच्या कालावधीत खूप काही शिकायला मिळाले असल्याचे प्रतिकिया कृष्णा यांनी व्यक्त केली आहे.कृष्णा यांनी यापुर्वी गडचिरोली,नागपूर येथे जिल्हाधिकारी पद तर गोंदिया येथे जिल्हा परिषदेचे मु्ख्य कार्यकारी अधिकारीचे पद सांभाळले होते.