१२ वीज केंद्रांत इको फ्रेंडली वीजनिर्मिती

0
11

नागपूर – चंद्रपूसह राज्यात १२ वीजनिर्मिती केंद्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीजनिर्मिती होत आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टाॅवर’ उभारण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात वीजनिर्मितीचा खर्चही कमी झालेला दिसेल, अशी माहिती िवस्तारित प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रदीप शिंगाडे यांनी दिली.
या केंद्रांमध्ये कोराडी येथील ६० मेगावॅटचे ३, भुसावळ येथील ५०० मेगावॅटचे २, खापरखेडा येथील ५०० मेगावॅटचा १, पारस व परळी येथील २५० मेगावॅटचे प्रत्येकी २ संच आणि चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटच्या २ संचाचा समावेश आहे. चंद्रपूर केंद्राची क्षमता वाढावी म्हणून ५०० मेगावॅटचे दोन संच कार्यान्वित करण्याचे ठरले. संच क्र. ८ व्यावसायिक तत्त्वावर ४ जून २०१६ पासून कार्यान्वित झाला. संच क्र. ९ ची चाचणी सुरू आहे. जुलैअखेर तो सुरू होईल. यापूर्वी वीजनिर्मिती केंद्रात इंड्यूस ड्राॅफ्ट कूलिंग टाॅवरचा (आयडीसीटी) उपयोग होत होता. हे टाॅवर चालवण्यासाठी विजेचा वापर होत असल्याने खर्च अधिक होता. एनडीसीटीमध्ये टाॅवरचा इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल देखभालीसह उभारणीचा खर्च १५८ कोटी, तर सिव्हिलसाठी ९६ कोटी खर्च येतो.