अश्लील मजकूर प्रकरणी परशुरामकर,तरोणेंवर गुन्हा दाखल ;जामिनावर सुटका

0
16

गोंदिया,दि.07- जिल्हा परिषदेच्या महिला उपाध्यक्षांना उद्देशून व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील मजकूर टाकल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांच्यासह गृप एडमीन असलेले किशोर तरोणेवर अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला होता.गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला उपाध्यक्ष व एका सभापतीला उद्देशून त्यांना जिल्हा परिषद सदस्य नावाने असलेल्या व्हाटसअप गृपवर टाकलेलेल्या एका मॅसेजप्रकरणात चौकशी व तपासानंतर गुन्हा दाखल केला होता. आज गुरूवारी (दि.७) त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी परशुरामकर यांच्या विरोधात व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील संदेश पोस्ट केल्याचा आरोप करीत तक्रार नोंदविली. यावर पोलिसांनी परशुरामकर व किशोर तरोणे यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३५४ अ (१) व (३), ५०९, १०७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बयाण नोंदविण्यात आले व परशुरामकर आणि तरोणे यांना गुरूवारपर्यंत (दि.७) न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार ते गुरूवारी न्यायालयात हजर झाले असता न्यायलयाने त्यांना जामीन मंजूर केला

विशेष म्हणजे याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी भाजपच्यावतीने पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले होते.तसेच वरच्यापातळीवरूनही यंत्रणेवर अटक करण्यासंबधी दबावतंत्राचा वापराचा प्रयत्नही केला गेला होता.परंतु पोलीसांनी आधी चौकशी करु नंतरच गु्न्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती.याप्रकरणी गंगाधर परशुरामकर,विलास कापगते,किशोर तरोणे,पी.जी.कटरे,चामेश्वर गहाणे,विश्वजित डोंगरे आणि महिला उपाध्यक्ष यांचेही बयाण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते.