माहिती विभागाचे दिलीप कुलकर्णी व प्रकाश मळेवाडकर यांना निरोप

0
26

नागपूर-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी दिलीप कुलकर्णी तसेच मुंबई येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सहायक संचालक प्रकाश मळेवाडकर यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार महासंचालनालयाच्या सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर व महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक शिवाजी मानकर, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक मोहन राठोड उपस्थित होते.

माहिती विभागातील दिलीप कुलकर्णी व प्रकाश मळेवाडकर हे 31 डिसेंबर,2014 रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. श्री.प्रकाश मळेवाडकर यांनी महासंचालनालयात 36 वर्ष सेवा केली असून श्री. कुलकर्णी यांची 29 वर्षाची सेवा झाली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर व महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या.

दिलीप कुलकर्णी माहिती केंद्राचे जिल्हा माहित अधिकारी या पदावर ऑगस्ट, 2014 पासून कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी पुणे, लातूर, मुंबई,सिंधूदुर्ग येथे माहिती अधिकारी या पदावरही काम केले आहे. श्री.प्रकाश मळेवाडकर हे अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने या विभागात अधिपरिक्षक तसेच मंत्रालयातील वृत्त विभागात उपसंपादक व त्यानंतर सहाय्यक संचालक यापदावर यशस्वीपणे काम केले आहे.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सर्वश्री अनिल गडेकर, अनिल ठाकरे, रवि गिते, सुरेश काचावार, विवेक खडसे, मंगेश वरकड, जगन्नाथ पाटील, हर्षवर्धन पवार, विलास बोडके, विलास कुडके, हेमराज बागूल, तसेच मंत्रालयातील व विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.