साकोलीत शेतकरी संपाला सर्वपक्षीय पाठिंबा

0
9

साकोली,दि.०५-संपामध्ये सरकार फुट पाढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत साकोली तालुक्यातील विविध पक्ष आणि संघटनांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करीता आज साकोली बंद ची हाक दिली.
शेतकरी संपाला पाठींबा देत साकोली तालुक्यातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून शासनाच्या धोरणाविरोधात सोमवारी बंद चे आवाहन करण्यात आले होते. साकोली येथील तहसील कार्यालयापुढे सकाळी शेतकरी संकट मोचन समिती,कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तथा विदर्भ राज्य आघाडी ने शासनाचा निषेध करून, जय जवान जय किसान असे नारे लावून व शेतातील भाजीपाला व दुध रस्त्यावर टाकून आंदोलन केले.राम महाजन, अविनाश ब्राह्मणकर, जि.प.सदस्य अशोक कापगते,डॉ. अजय तुमसरे, नंदकिशोर समरीत, विदर्भ राज्य आघाडीचे सचिव राकेश भास्कर, राष्ट्रवादीचे मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, डॉ.अनिल शेंडे, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे व इतर संघटनेच्या पदाधीका-यांसह शेतकरी उपस्थित होते.