अर्धापूर वळण रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण अधिक्षक अभियंता पथकाकडून चौकशी

0
10

नांदेड,दि.13:नांदेड- नागपूर महामार्ग अर्धापूर वळण रस्त्याच्या  निकृष्ट कामाच्या  तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेउन चौकशी सुरू केली आहे.यापुर्वी चामकर यांनी केलेल्या चौकशीवर नागरिकांनी असमाधान व्यक्त करीत फेरचौकशीची मागणी केली होती.त्यावरुन नाशिक गुणनियंत्रक विभागाचे अधिक्षक अभियंता  एस.एस.पाटील व त्यांच्या पथकाने बुधवारी सदर रस्त्याची पाहणी करुन चौकशी केली.सदर पाहणीत रस्ता बांधकाम हे अतिशय निकृष्ठ झाल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने संबधीत ठेकेदार,अभियंताना हे प्रकरण भोवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नांदेड नागपूर महामार्ग  अर्धापूर शहराच्या मधुन जात असल्याने अनेक अपघात व वाहतुकीस आडथळा निर्माण व्हायचा त्यामुळे नागरिकांनी वळण रस्त्याची मागणी केली होती.शहरवासियांच्या मागणीनुसार केंद्र सरकारच्या (सी.आर.एफ.) केन्द्रीय रस्ता विकास निधी अंतर्गत २० कोटी केंद्र व राज्य शासनाचा ३.५ कोटी रूपये खर्च करून सहा किमीच्या वळणरस्त्याचे काम मुदतीतही पुर्ण झाले नाही.त्यामुळे कामाला मुदतवाढ देण्यात आली.शासनाने दिलेल्या साडेतीन कोटी रुपयाच्या निधीचा वापर सुद्दा निकष पायदळी तुडवत करुन रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ दर्ज्याचे करण्यात आल्याने रस्ता पुर्णंत खराब झाला.रस्त्यावर झालेले बी.बी.एम,बी.एम,डी.बी.एम,व कारपेटचे काम निकृष्ट दर्जाचे आहे.हा राष्ट्रीय महामार्ग असुन नेहमी जड वाहनाची वर्दळ असल्याने रस्ता लगेच खराब झाल्याने जागरूक मंडळीने कामाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली.त्याची दखल घेत राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले.काही दिवसापूर्वी गुणनियंत्रक अधिक्षक अभियंता मुंबई येथील चामकुरे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीचा अहवालात संबधीताना वाचविण्याचे काम करण्यात आल्याने पुन्हा चौकशीची मागणी करण्यात आली.त्यानुसार नाशिक गुणनियंत्रक विभागाचे अधिक्षक अभियंता एस.एस.पाटील यांनी आज गुरूवारला(दि.१३)महामार्गाची पाहणी केली असता त्यांना अनेक ठिकाणी खड्डे असल्याचे दिसून आले.यावेळी पत्रकार व नागरीक उपस्थित होते.