कर्जमाफीमुळे 82 टक्के शेतक-यांचा सातबारा होणार कोरा – मुख्यमंत्री

0
8

मुंबई, दि. 27 – कर्जाच्या फे-यात अडकलेल्या शेतक-याची सुटका करण्यासाठी कर्जमुक्ती एक तोडगा आहे पण हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही. शेतक-यांची कायमस्वरुपी कर्जाच्या फे-यातून सुटका करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत कर्जमाफीवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. कर्जमाफी हा केवळ पहिला टप्पा आहे.
कर्ज परतफेडीसाठी शेतक-याला सक्षम करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोणाच्या ताब्यात किती जमीन आहे याचा विचार करुन सरसकट दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा राज्यातील 82 टक्के शेतक-यांना फायदा होणार असून, त्यांचा सातबारा कोरा होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री…?
>कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही.
>शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज त्यांना फेडता आले पाहिजे.
>कर्जमाफी हा शेतकरी समस्येवरील अंतिम उपाय नाही.
>कर्जामाफी हा केवळ पहिला टप्पा- मुख्यमंत्री
>इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कर्जामाफी.
>सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार.
>जुन्या कर्जमाफीप्रमाणे त्रुटी राहू नये म्हणून फॉर्मची पद्धत.
>कर्जमाफीसाठी मोबाइल अॅपही लॉन्च करणाऱ.
>कर्जमाफीचा फॉर्म सोपा असून कुणीही भरू शकेल.
>कर्जमाफीचा फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईनही भरता येईल.
>कर्जमाफीत झालेले घोटाळे टाळण्यासठी फॉर्ममध्ये बदल
>2009 मध्ये झालेल्या कर्जमाफीची संपुर्ण यादी मिळतच नाही, मुख्यमंत्र्यांचा आघाडी सरकारवर आरोप.
>2008-09 मध्ये मुंबईतच जास्त कर्जमाफी झाली.