जन्मदात्या आईकडूनच चिमुरड्याची गळा चिरुन हत्या

0
19

गोंदिया,दि. ८- मरारटोली परिसरात एक हृदयविदारक घटना समोर आली. एका जन्मदात्या आईने आपल्या 8 वर्षांच्या मुलाचा गळा चिरुन हत्या करुन मुलाच्या हत्येनंतर स्वतःचाही गळा चिरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी महिलेला वाचवले आहे. पिंकी आलम असे महिलेचे नाव आहे.मृत चिमुरडा अनुप आलम हा तिसरीत शिकणारा अवघ्या 8 वर्षांचा मुलगा होता. महिलेने कौटुंबिक वादातून चिमुरड्याची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे.दरम्यान, पिंकी आलमवर जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करून उपचार सुरु आहेत. त्यामुळे हत्येमागचं नेमकं कारण कळण्यास मार्ग नाही. सदर महिलेचा पती गोंदिया महाराष्ट राज्य परिवहन आगारात नोकरीवर आहे.याप्रकरणी रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.