विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला

0
11

 

 नवी दिल्ली- विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६१.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी गॅस कंपनी इंडियन ऑईलने विनाअनुदानित एनलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ६१.५० रुपयांची वाढ केली आहे.

ही वाढ देशाच्या चार प्रमुख महानगरांमध्ये लागू होणार आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या अन्य पेट्रोलियम कंपन्याही इंडियन ऑईलचेच दर मान्य करतात.

या वाढीनंतर विनाअनुदानित १४.५ किलोच्या सिलेंडरसाठी दिल्लीमधील ग्राहकांना ५४५ ऐवजी ६०६.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत यासाठी ५५५ रुपयांऐवजी ६१८ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये ६३६.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ६२१ रुपये मोजावे लागतील.

इंडियन ऑईल कंपनीतर्फे दर १६ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत आढावा बैठक घेण्यात येते. तर एलपीजी सिलेंडर आणि विमान इंधन किंमतीसंदर्भात दर महिन्याला आढावा घेतला जातो.

यापूर्वी एक नोव्हेंबरला विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात सरासरी २७.६३ रुपयांची वाढ करण्यात आली होती.