‘ताजमहाल शिवमंदिर असल्याचा पुरावा नाही’

0
10

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- “ताजमहाल‘ हे शंकराचे पुरातन मंदिर असल्याचा कोणताही सबळ पुरावा केंद्र सरकारकडे उपलब्ध नसल्याचे सरकारने आज (मंगळवार) स्पष्ट केले आहे.

ताजमहाल या पुरातन वास्तूला शिवमंदिर घोषित करण्यासंदर्भात आज एआयएडीएमकेचे लोकसभेतील सदस्य सेनगुत्तुवन यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शर्मा म्हणाले, “ताजमहाल हे पुरातन शिवमंदिर होते हे सिद्ध करणारा कोणताही सबळ पुरावा सरकारकडे उपलब्ध नाही.‘ यापूर्वीही एकदा हा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यावेळीही शर्मा यांनी ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नसल्याचे म्हटले होते. आग्य्रातील एका संघटनेने अलिकडेच ताजमहाल मुळात पुरातन शिवालय असल्याचा दावा करत याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती.