व्हॉट्स अॅप होणार बंद

0
10

जगभरात लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपने या वर्षाअखेर ब्लॅकबेरी ओएसच्या सर्व फोनना सपोर्ट करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये ब्लॅकबेरीचा लेटेस्ट व्हर्जन ब्लॅकबेरी १०चाही समावेश आहे. व्हॉट्सअॅप बंद होणा-या स्मार्टफोनमध्ये केवळ ब्लॅकबेरीचाच समावेश नाही. तर यात नोकियाची एस ४० सीरीज, नोकिया सिम्बियन एस ६०, अॅन्ड्रॉइट २.१, अॅन्ड्रॉइट २.२ आणि विंडोज फोन ७.१चा ही समावेश आहे.  म्हणजेच पुढील वर्षापासून हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपने एक ब्लॉग प्रसिद्ध करून यासंबंधीची माहिती दिली. २००९ साली व्हॉट्सअॅप या मॅसेजिंग सर्व्हिसची सुरुवात झाली होती. त्यानंतर यात अनेक बदल होत गेले. भविष्यातही व्हॉट्सअॅपमध्ये आणखी काही बदल होणार असून सदर स्मार्टफोनच्या सिस्टीम या त्याला सपोर्ट करण्यासाठी पुरेशा नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ब्लॉगवर म्हटले आहे.