किंगफिशर’च्या विजय मल्ल्यांनी देश सोडला

0
9

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कर्जबुडवेगिरीसंदर्भातील प्रकरणामध्ये आरोपी असलेले किंगफिशर एअरलाईन्स या बुडीत कंपनीचे संचालक उद्योगपती विजय मल्ल्या यांनी देश सोडल्याची माहिती महाधिवक्ते मुकुल रोहतागी यांनी आज (बुधवार) दिली.

सुमारे 9 हजार कोटी रुपयांच्या थकित कर्जाच्या प्रकरणासंदर्भात मल्ल्या यांचे पारपत्र जप्त करुन त्यांना हा देश सोडण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी मल्ल्या यांनी कर्ज घेतलेल्या 17 सार्वजनिक बॅंकेच्या प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयामध्ये केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने विचारणा करताच राज्यसभेचे सदस्य असलेल्या मल्ल्या यांनी हा देश त्रक्रार दाखल केलेल्या दिवशीच सोडल्याची माहिती रोहतागी यांनी न्यायालयास दिली. रोहतागी यांनी केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) यासंदर्भात माहिती विचारल्यानंतर मल्ल्यांनी सोडल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांना नोटिस बजावली आहे.