रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात, गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त

0
11
नवी दिल्ली, दि. ५ – रिझर्व्ह बँकेने नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला असून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची (0.25%) कपात करण्यात आली आहे. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने  वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर रेपो रेट 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज तसेच वाहन कर्ज  स्वस्त होण्याची शक्यता असून कर्जधारकांना दिलासा मिळाला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सकाळी पतधोरण जाहीर केले. आजच्या धोरणात व्याजाचा दर 0.50 टक्क्यांनी कमी होण्याची बाजारपेठेला अपेक्षा होती, मात्र रघुराम राजन यांनी पाव टक्क्यांचीच कपात घोषित केली. दरम्यान कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये (रोख राखीव प्रमाण) कोणताही बदल करण्यात आला नसून तो ४ टक्क्यांवर कायम आहे.