काम नाही वेतन नाही धोरण रद्द करा

0
37
गोंदिया : विजाभज आश्रम शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाNयांचे समायोजन होईपर्यंत त्यांना ‘काम नाही वेतन नाही’ या शासन निर्णयाच्या विरोधात विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाNयांनी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर आज (दि.५) निषेध नोंदविला. दरम्यान शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
 जिल्हा परिषद, नगर परिषद विंâवा इतर विभागातील अतिरिक्त असलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाNयांना त्यांचे समायोजन होईपर्यंत त्याच आस्थापनेवर वेतन अदा केले जाते. संबंधीत विभागाने त्याबाबद वेळोवेळी परिपत्रकेसुद्धा निर्गमीत केलेली आहेत. परंतु सामाजिक न्याय विभागाच्या १ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार विजाभज आश्रम शाळेतील कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाNयांवर अन्याय होत असल्याचा आरोप विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळा कर्मचारी संघटनेने केला आहे. स्वंयसेवी संस्थांकडून विजाभज विद्याथ्र्यांसाठी चालविल्या जाणाNया मान्यता प्राप्त अनुदानीत आश्रम शाळा शासनाच्या ध्येय धोरणानुसार चालविल्या जात नसल्यामुळे आश्रम शाळांची मान्यता रद्द केल्यानंतर अशा शाळांतील कायम मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाNयांचे नियमानुसार समायोजन होईपर्यंतच्या कालावधीत ‘काम नाही वेतन  नाही’ हे धोरण लागू करण्यात आले आहे. पटसंख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाNयांनादेखील हे धोरण लागू राहील. हे निर्णय अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यात ५ प्राथमिक आणि ३ माध्यमिक अशा ८ विजाभज आश्रम शाळा आहेत. जवळपास ९० कर्मचारी कार्यरत असून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास ९ ते १० कर्मचारी प्रभावी होऊ शकतात. तर राज्यात जवळपास १२०० शाळा असल्याने अनेक कर्मचाNयांवर अन्याय होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान १ एप्रिल २०१६ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वी सदर शासन निर्णय रद्द करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयाच्या निषेधार्थ ६ एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण विजाभज आश्रम शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाNयारी काळ्या फिती लावून कार्य करतील. जर शासन निर्णय रद्द झाले नाही तर संघटनेला कर्मचाNयांच्या मुलभूत हक्काच्या संरक्षणासाठी बेमुदत शाळा बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अरूण बन्सोड, के.के.पुस्तोडे, आर.पी.पराते, एम.एस.देवारे, बी.आर.मस्के, ए.एच.येळे, आर.बी.रामटेके, एम.जे.घोरमाडे, एम.एस.देव्हारे, वाय.एम.चौधरी, सी.डी.शरणागत, टी.आर.खांडवाये, एल.आर.शेंडे, डी.एम.कापगते, आय.एम.हेडाऊ, एस.बी.गौतम आदिंसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.