200 रुपयांची नोट उद्यापासून येणार चलनात

0
35

नवी दिल्ली,दि.24(वृत्तसंस्था)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार असल्याची माहिती दिली आहे. 200 रुपयांची नोट चलनात आल्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅश तुटवडा भरुन काढण्यात मदत मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने नवी नोट चलनात आणणार असल्याची माहिती दिली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटेची डिझाईन रिलीज केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मार्च महिन्यातच ही नवी नोट आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुरक्षा चाचण्या आणि प्रिंटिंग प्रेसमधील क्वालिटी तपासल्यानंतरच ही नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.