256 रुग्णांची मोफत आरोग्य तापसणी

0
61
नांदेड( सय्यद रियाज),दि.27ः- बिलोलीचा ग्रामीण रुग्णालयात शेवटचा  मोफत आयुष युनानी निदान व उपचार शिबिर ग्रामीण  रुग्णालय येथे पार पडला या शिबिराचे अध्यक्ष डॉ. सौ. संपदा पल्लेवाड(ठक्करवाड) यांनी आयुर्वेधीक,युनानी(आयुष)उपचार पद्धती आज घळीला काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालय येथे आज दि.27 डिसेबंर बुधवारला बिलोली ग्रामीण रुग्णाल्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान,महाराष्ट्र शासन आयुष कक्ष राज्य आरोग्य  सोसायटी, महाराष्ट्र शासन अंतर्गत मोफत आयुर्वेधीक,होमिओपैथीक व युनानी उपचार पध्दती शिबिरात एकूण 256 रुग्णानची मोफत आरोग्य तापसणी करुन मोफत औषधी देण्यात आले.आयुष निदान शिबिराचे अध्यक्ष डॉ. सौ. संपदा पल्लेवाड(टक्करवाड),प्रमुख पाहुणे डॉ. अक्षय देसाई हे उपस्थित होते.या शिबिरात आयुर्वेदिक मध्ये वात रोग ,संधी वात, मधुमेह,अम्लपित्त, या वर सल्ला व मोफत औषधी देण्यात आले. युनानी पध्दती मध्ये श्वसन संस्थे चे आजार,त्वचा रोग, अलर्जी, व किडनी चे आजार,स्त्री रोग ,पचन संस्थेचे आजार व मु ळव्याध यावर सल्ला देण्यात आला.  या शिबिरात एकूण 256 रुग्णानी तपासणी करुन उपचार करण्यात  आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जईम अहेमद सिद्दिखी यांनी सांगितले.या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ .संपदा पल्लेवाड (ठक्करवाड),डॉ. अक्षय देसाई,वैद्यकीय अधिकारी डॉ. जईम अहेमद सिद्दिखी, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील कदम,वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख समीरा,डॉ. लक्ष्मण केशटवार ,डॉ. नांदेडे,डॉ. गव्हाने मैडम, डॉ. विलास मुसळे यांचा सह आदि डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले.