विवेकानंद वाचनालयात समूह गीत स्पर्धा

0
25
लाखनी,दि.27ः- राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी येथे आज राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर यांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात बहुसंख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सौ संध्या हेमने आणि भाजपा महामंत्री नीरज मेश्राम यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण गुणवंत दिघोरे आणि अक्षय मासुरकर यांनी केले तर या संपूर्ण स्पर्धेचे बक्षीस वितरण गझलकार प्रल्हाद सोनेवाने सर यांच्या हस्ते करण्यात आले. यात आफ्रिन सिद्धीकी आणि प्राची पचारे यांचा प्रथम क्रमांक, ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, सालेभाटा यांचा द्वितीय तर समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी विदर्भ कला महाविद्यालय, समर्थ विद्यालय, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, जि प गांधी विद्यालय, समर्थ प्राथमिक विद्यालय, निर्धन महाविद्यालय, लाखनी जि प प्राथमिक शाळा, सेलोटी, संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, सलेभाटा येथिल विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने भाग घेतला होता. तनुश्री गोस्वामी, सानिया रामटेके, पूनम पटले व खुलागटात पंकज सिंगनजुडे, नकुल पूर्णये, सर्वर शकील सिद्धीकी या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन सौरभ येळणे यांनी केले तर आभार अक्षय मासुरकर यांनी मानले.