प्रकाश पोवाडे याना स्व.माधव आंबुलगेकर पञकारिता पुरस्कार प्रदान

0
12
 नांदेड( सय्यद रियाज),दि.06ः-   बिलोली येथिल पञकार आणि पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी प्रकाश पोवाडे तथा नगरसेवक यांना मिमासा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ, पञकार प्रेस परिषद ,ह्युमन राईटस फाऊंडेशन, दै.समिक्षा, व मंथन क्रिएटिव्ह ग्रुप नांदेडच्या वतीने   स्व.माधव आंबुलगेकर युवा पञकारिता पुरस्कार  पञकार दिनाच्या पुर्व संध्येला  मान्यवरांच्या हास्ते देऊन  त्यांचा गौरव करण्यात आला. मीमासा फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ यांच्या वतीने  गेल्या आनेक वर्षापासुन पञकारिता क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करणाऱ्या पञकारांचा विविध पुरस्कार देऊन सन्मानीत केल्या जाते. यंदाचा स्व. माधव आंबुलगेकर युवा पञकारीता पुरस्काराचे मानकरी बिलोली येथिल दै.पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी प्रकाश पोवाडे तथा नगरसेवक प्रकाश पोवाडे याना दि.5 जानेवारी रोजी नांदेड येथिल मिनी विश्रामग्रहाच्या सभागृहात आयोजित  कार्यक्रमात आमदार डि.पी.सावंत ,पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद व पञकार क्षेत्रातील नामवंत मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपञ देऊन सन्मानित करण्यात आले.