सकारात्मक दृष्टीकोनाची पत्रकारीता जिल्हा विकासासाठी सार्थक : विवेक खडसे

0
12
गोंदिया,दि.06 : जिल्ह्यात सकारात्मक दृष्टीकोनातून माध्यमाचे प्रतिनिधी आपल्या लेखनीतून कार्य करित आहेत, त्यामुळे हा जिल्हा राज्याच्या टोकावरचा असला तरी शासकीय योजना आणि इतर बाबींच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात जुडू लागला आहे. एंकदरीत सकारात्मक दृष्टीकोनाची पत्रकारीता या जिल्ह्याच्या विकासासाठी सार्थक ठरू लागली आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या वतीने पत्रकार दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सचिव रवि आर्य, संतोष शर्मा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी विवेक खडसे पुढे म्हणाले, पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त संकल्प करायचे असे त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी रवि आर्य, संतोष शर्मा यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिदायत शेख यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला व आभार प्रदर्शन उदय चक्रधर यांनी केले. कार्यक्रमात प्रामुख्याने अंकुश गुंडावार, योगेश राऊत,  जावेद खान, आशिष वर्मा, भरत घासले, देवानंद शहारे, नरेश रहिले, नरेंद्र सिंद्रामे, मोहन पवार, जयंत मुरकुटे, दत्तात्रय दलाल, मुकेश शर्मा, प्रमोद नागनाथे आदि उपस्थित होते.