बडुर परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस..!

0
15
इंडियन पँथर् सेनेने  दिले तहसीलदारांना निवेदन..
नांदेड,दि.15  देगलूर वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या  बिलोली तालुक्यातील बडुर येथे जंगली प्राण्यांने  शेतकऱ्यांच्या तोंडी आलेले हरभरा,तूर,ज्वारी हे पीक पळवल आहे.एकीकडे कोरडा दुष्काळ,ओला दुष्काळ या संकटातून सावरत असतांनाच जंगली प्राण्यांने शेतकऱ्यांच्या शेतात घातलेल्या रानडुकराच्या कळपाने पिकांचे खूप मोठे नुकसाने केले आहे.या संबधी वनविभागाच्या महा फॉरेस्ट या वेबसाइट वरून बडुरच्या काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी अर्ज 2 महिन्यापूर्वी  केला होता.वनविभागाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण करून दिली.आज दोन महीने उलटूनही शेतकऱ्यांना कुठल्याच पद्धतीची नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे संतप्त शेतकरी संतप्त झाले आहेत.
     इंडियन पँथर् सेनेचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांच्या नेत्रुत्वात काल तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी शेषेराव जेठे,शिवाजी विचारे,लोकस्वराज्य आंदोलनाचे लालबा गोनेकर,देविदास कोंडलाडे,आदि उपस्थित होते.तात्काळ नुकसान भरपाई नाही मिळाल्यास 26 जानेवारीला उपविभागिय वन संरक्षण अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर संबधीत शेतकऱ्यांने जवाब दो आंदोलनाचा इशारा दिला आहे.तहसीलदाराना देण्यात आलेल्या निवेदनावर सौ.शांताबाई दुगाने,भीमराव दुगाने,गौतम सोनकांबळे,विठाबाई दुगाने,गोदाबाई सोनकांबकळे,सोपान सोनकांबळे,लक्ष्मण भालेराव इत्यादि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.