लोकराज्य पोलीस विशेषांकाचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विमोचन

0
18

गोंदिया,दि.१५ : शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा जानेवारी २०१८ चा अंक हा आपले पोलीस आपली अस्मिता यावर आधारीत पोलीस विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांच्या कक्षात १५ जानेवारी रोजी लोकराज्य पोलीस विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकराज्यचा हा पोलीस विशेषांक पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. अंकातील माहिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानात भर घालणारी आहे. या अंकामधील माहितीमुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने काम करण्यास मदत होणार आहे. तसेच हा अंक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी विमोचनप्रसंगी व्यक्त केले.
या लोकराज्य पोलीस विशेषांकात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात पोलिसांचा मोठा हातभार लागला असून कायदा व सुव्यवस्था उत्तमप्रकारे हाताळण्यात आली आहे. दहशतवाद, नक्षलवाद, सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हेगारी या प्रकारच्या आव्हानांचा सामना महाराष्ट्र पोलीस समर्थपणे करीत असल्याची माहिती असून सुरक्षीत सुव्यवस्थीत महाराष्ट्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रतिसाद आणि प्राधान्य यावर गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी या विषयावर विशेषांकाच्या माध्यमातून विचार व्यक्त केले आहे. महामार्गाचे रक्षक, फोर्स वन, तत्पर तपास आणि अपराधसिध्दीत वाढ, संवेदनशील कार्यक्षमता, पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, गुन्हेसिध्दीचे शास्त्रीय तंत्र, डिजीटल तपासाची स्मार्ट दिशा, सायबर युगाची आव्हाने, सायबर गुन्ह्यांचा पाठलाग, सागरी सुरक्षीततेची सज्जता, गृहरक्षक, संपर्कदूत दक्षता यासह गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभव आणि निसर्ग पर्यटनावर लेख सुध्दा या अंकात आहे. या अंकाची किंमत केवळ १० रुपये असून हा अंक विक्रीसाठी जिल्हा माहिती कार्यालय येथे उपलब्ध आहे.