रतन टाटा यांचा अमेरिकेत ‘डॉक्टरेट’ने सन्मान

0
18

साऊथ कॅरोलिना : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग क्षेत्रात डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण कॅरोलिना येथे होणाऱ्या ऑटोमोटिव्ह शिखर परिषदेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

“टाटा हे जागतिक स्तरावरील पुढारी असून त्यांचा भारताच्या बाहेरदेखील तेवढाच प्रभाव आहे. ते कोणतेही काम एकाग्रतेने आणि करूणेने करतात. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा,” असे क्लेमसन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष जेम्स क्लेमेन्ट्स यांनी सांगितले.

रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहात प्रवेश केला होता. त्यानंतर 1981 साली त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चरची पदवी मिळवल्यानंतर टाटा यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्यवस्थापन(अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम) क्षेत्रात उच्चशिक्षण घेतले आहे.