व्यापारी संकुल लिलावातून मिळालेल्या २ कोटी रुपयातून अग्निशमन बंब खरेदी करा-इंडियन पँथर सेना

0
9
बिलोली  दि. २५ :तालुका सर्वात जुना,सर्वात मोठा,शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा तेलंगणा सीमेवरील तालुका आहे.परंतु स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही विकासापासून कोसोदूर असून हा तालुका आगीपासून स्वतःचे संरक्षण करण्याइतकी पात्रता तो निर्माण करू शकला नाही.या सामाजिक मुद्याकडे कुठल्याच राजकीय पक्षाचे लक्ष नसून नांदेड जिल्ह्यात कार्यरत असणारी इंडियन पँथर सेना यासाठी पुढाकार घेऊन १ जुलै पासून सतत पाठपुरावा करीत आहे.इंडियन पँथर सेनेचे संस्थापक संविधान दुगाने यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता.गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अग्निशमन अधिकारी यांना पत्र काढले खरे पण हा पत्र व्यवहार दिशाभूल करणारा असून स्वातंत्र्य दिनी नियोजित आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी केला गेला असा आरोप दुगाने यांनी निवेदनात केला आहे.
        सविस्तर बाब अशी,की बिलोली तालुक्यात आजपर्यंत घडलेल्या अग्नितांडवाच्या घटनांचा विचार करता तालुक्यात अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने व इतर तालुक्यातील बंबवर अवलंबून असल्याने आजपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु मे जून मध्ये बिलोलीत लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांनी जनावरांसाठी राखून ठेवलेला कडबा व कृषी अवजारे जळून खाक झाली होती.या घटनेचे जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वच जण साक्षीदार आहात.त्यानंतर बिलोली तहसील कार्यालय व पंचायत समिती शेजारील सुशिक्षित बेरोजगार लोकांची झेरॉक्स दुकाने जळून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते या अग्नितांडवणी जर विस्तृत रूप धारण केले असते तर पंचायत समिती, तहसील कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाना,पोलीस स्टेशन ही सर्व शासकीय कार्यालये जळून खाक झाली असती.जीवित हानी व मोठे नुकसान होण्याअगोदर त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.अग्निशमन अधिकारी यांना काढलेल्या पत्राचा खुलासा करताना महानगर पालिका उप आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे की अग्निशमन बंब उपलब्ध करणे त्यात्या नगर परिषद/पालिकेचे काम आहे.जिल्ह्यातील देगलूर,धर्माबाद,किनवट,माहूर,हदगाव,भोकर, कंधार,लोहा, मुखेड,या नगर परिषदांनी स्वतःचे अग्निशमन वाहन खरेदी करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करून सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.असा स्पष्ट उल्लेख महापालिका उप यायुक्तांनी  दुगाने व जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून दिलेल्या पत्रात केला आहे.महापालिका उपआयुक्त व जिल्हाधिकारी यांनी करत असलेला चाल ढकलपना बिलोली तालुका वासियांसाठी धोकादायक असून जनतेला आगीपासून धोका आहे.
   भारतीय संविधानाच्या अनुछेद २४३ झेड,डी च्या खंड ३ च्या तरतुदींचे अनुपालन करून संबधित नागरपरिषदेची तितकी अवक नसल्यास जिल्हा नियोजन समिती हातभार लावू शकते कारण जिल्ह्यातील पंचायतिनी आणि नगरपालिकांनी तयार केलेल्या योजना व गरज विचारात घेणे संपूर्ण जिल्ह्याकरिता विकास योजनेचा मसुदा तयार करणे हे जिल्हा नियोजन समिती चे प्रमुख कार्य आहे त्यासाठी तात्काळ अग्निशमन बंब खरेदी करण्यासाठी बिलोली नगर परिषदेस आदेशीत करावे किंवा बिलोली नगर परिषदेच्या २८ गाळाच्या लिलावातून नगर परिषदेस मिळालेल्या २ कोटी रुपयातून स्वतःचे अग्निशमन बंब खरेदी करून ही सेवा पुरवावी किंवा जिल्हा नियोजन विकास आराखडातून अग्निशमन उपलब्ध करून द्यावे सदरील तिन्ही पर्यायापैकी एक पर्याय निवडून तात्काळ बिलोली सर्वात मोठ्या, सर्वात जुन्या,व सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या पण मागास व अविकसित तालुक्याचा विकास करावा अन्यथा विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात येईल असा इशारा ही पँथर प्रमुख संविधान दुगाने यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.त्याची प्रत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (दक्षिण)नांदेड यांना देण्यात आली. यावर नगर परिषद व जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील याकडे बिलोली वासीयांचे लक्ष लागले आहे.