वृत्तपत्र विक्रेत्यांनी कल्याणकारी मंडळासाठी दिले धरणे

0
9
गोंदिया,दि.२५- राज्यातील वृत्तप़त्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज मंगळवार (दि.२५) ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन कल्याणकारी मंडळाचे काम सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारीमार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
नागपूर येथे १६ जुलै २०१८ रोजी राज्य संघटनेच्या शिष्टमंडळासोबत कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या चर्चेनुसार १५ ऑगस्ट पासून नोंदणी सुरू  करण्यात येणार होती.परंतु आजपर्यंत कल्याणकारी मंडळाच्या कामाला सुरूवात झालेली नाही.तेव्हा १५ सप्टेंबर पर्यंत नोंदणी सुरू करून कल्याणकारी मंडळाचे कामकाज तत्काळ सुरू  करावे अन्यथा २५ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईसह राज्यभर जिल्हाधिकारी व तहसीलकार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने  दिला होता,त्यानुसार आज धरणे आंदोलन करण्यात आले.असंघटित कामगार म्हणून वृत्तपत्र विकेत्यांची नोंदणी तत्काळ सुरू करणे,मंडळाच्या कामकाजासाठी सेवा सुविधा देउन मंडळ कार्यान्वित करावे, असंघटित कामगार वृत्तप़त्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने आर्थिक तरतूद करावी,महाराष्ट राज्य असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तप़त्र विक्रेत्यासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावे,जागा उपलब्ध करून द्यावी,अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नये,घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात या मागण्यांचा समावेश होता.आंदोलनात गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रमोद भोयर, राज्य कार्याध्यक्ष दिनेश उके,राजेश वैद्य,दुर्गाप्रसाद अग्रहरी,राजेश साठवणे,प्रीतीराज मेश्राम,भाष्कर कडव,सुनिल मेश्राम,संतोष कोठेवार,महेश तरोणे,हरजित वाढई,मिqलद गणविर(भाकप),दत्ता गजभिये,देवेंद्र रामटेके,अमित गणविर,शिवकुमार कोटवार,संजय दोनोडे,जगदिश शहारे,प्रकाश साखरे,संजय बडोले,दिलीप बोरकर,जितेंद्र बोबंले,चंद्रमुनी बनसोड,केवल लांजेवार,विरेंद्र अग्रवाल,भोजू देवगडे,प्रमोद ठाकरे,तसेच सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी सहभागी झाले होते.या आंदोलनाला ओबीसी संघर्ष कृती समिती,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,श्रमिक पत्रकार संघ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाqठबा जाहिर केला.