नवरात्रोत्सवात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्तींची स्थापना

0
4

गोंदिया दि.१२: नवरात्रोत्सवाला उद्या मंगळवारपासून (दि.१३) सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ३५ दुर्गा, ३० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २० दुर्गा व २० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५७ दुर्गा व २८ शारदा स्थापन होणार आहे.

आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ७० दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ६९ दुर्गा व ३८ शारदा स्थापन होणार आहे. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा व ५७ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२ दुर्गा व ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १५ दुर्गा व ६४ शारदा स्थापन करण्यात येणार आहे.

गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५० दुर्गा व ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५ दुर्गा व २५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २३ दुर्गा व ४५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे.

तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४० दुर्गा व ८ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५५ दुर्गा व १६ शारदा स्थापन करण्यात येणार आहे.