बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी मतदान सुरू

0
11
वृत्तसंस्था
पाटणा दि.५– भाजप, जदयू व राजद या प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविलेल्या बिहार विधानसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 नोव्हेंबरला (रविवार) लागणार आहेत.
 
बिहारमध्ये सत्ताधारी जदयू यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस यासह अन्य काही स्थानिक पक्षांना एकत्र घेत महागठबंधन तयार करत भाजपला कडवी लढत दिली आहे. तर, भाजपनेही रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी, जीतनराम मांझी यांना एकत्र घेऊन निवडणूक लढविली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि राजद यांच्यात जोरदार लढत पहायला मिळत आहे. भाजपने प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गोहत्या प्रकरणावरून जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला महागठबंधनच्या नेत्यांनी विरोध केला आहे.
 
आज अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होत असून, सकाळपासून मतदारांच्या मतदानकेंद्रांवर रांगा पहायला मिळत आहेत. बिहारमधील निकालाकडे देशभराचे लक्ष लागून राहिले आहे.