‘पवनहंस’चे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

0
13

मुंबई –दि.५ अंधारात उतरण्याचा सराव सुरू असताना “पवनहंस‘ कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी रात्री अरबी समुद्रात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आहेत. मुंबई हायजवळ ही दुर्घटना घडली. नौदलाने हेलिकॉप्टर व वैमानिकांचा शोध सुरू केला असून, अद्याप बचाव पथकाच्या हाती काहीही लागलेले नाही.

जुहू येथील एअरोड्रमहून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. सायंकाळी 7.30 च्या सुमारास मुंबईहाय परिसरात असलेल्या ओएनजीसीच्या ऑईल रिगजवळ ते गस्त घालत होते. हेलिकॉप्टर उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असणारे कॅप्टन ई सॅम्युअल हे या हेलिकॉप्टरचे सारथ्य करत होते. ते या महिनाअखेरीस निवृत्त होणार होते.
खवळलेल्या समुद्रात अंधारात लॅन्डिंगचा सराव करण्याचा प्रयत्न सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि हेलिकॉप्टर कोसळले.
मुंबईच्या पश्‍चिम-उत्तर-पश्‍चिम दिशेला 80 समुद्र मैलावर ही दुर्घटना घडली. दोन इमिजिएट सपोर्ट व्हेसल्स, आयएनएस मुंबई ही विनाशिका आणि एक इंटीग्रल हेलिकॉप्टर या मोहिमेवर पाठवण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये एकही प्रवासी नव्हता.