राजधानीत सद्भावना दिन साजरा

0
12

नवी दिल्ली, दि. 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी श्री गोयल यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी- कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली .

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा  

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी  स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.