राहुल गांधींविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

0
7

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावर सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरीकत्वाच्या मुद्यावर सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

दाखल झालेल्या याचिकेमध्ये अजिबात गांर्भीय नसून, याचिका सुनावणी घेण्याच्या योग्यतेची नसल्याचे मुख्य न्यायामूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले.

तथ्यांची पडताळणी केल्याशिवाय याचिकाकर्त्याने राहुल गांधींवर आधारहीन आरोप केले आहेत असे खंडपीठाने नमूद केले. राहुल गांधींनी निवडणूक कायद्यांचे उल्लंघन केले आहे का ? हे पाहण्याचे काम निवडणूक आयोग करेल असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.

राहुल गांधी यांनी ब्रिटीश यंत्रणेसमोर स्वत:ला ब्रिटीश नागरीक म्हणून जाहीर केल्याचा आरोप अलीकडे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.