शहांची बिनविरोध निवड, नाही आले अडवाणी- जोशी

0
10

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. २४ – लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठीभाजपाला संपूर्ण बहुमत मिळवून देण्यात अतिशय मोलाचा वाटा बजावणारे अमित शहा यांची आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. भाजपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शहा यांच्या विरोधात कोणीच उभे न राहिल्याने त्यांची एकमताने आणि बिनविरोध निवड झाली.  पुढील तीन वर्षांसाठी अमित शाह यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा अमित शहांची गळ्यात पडली आहे. शनिवारी त्यांच्या पहिल्या टर्मचा कार्यकाळ संपला होता. ते दीड वर्षे पक्षाध्यक्ष होते. आता त्यांना पूर्ण तीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. 2019 पर्यंत ते पक्षाध्यक्ष असतील. 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक आहे, हे त्यांच्या आगामी कार्यकाळातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, आज भाजप मुख्यालयात सर्व नेते कार्यकर्ते हजर असताना ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी गैरहजर होते