भाजपाध्यक्षपदी पुन्हा अमित शहांचीच नियुक्ती?

0
5
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २४ – लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठीभाजपाला संपूर्ण बहुमत मिळवून देण्यात अतिशय मोलाचा वाटा बजावणारे अमित शहा यांची आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार असून दुपारी १ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र ही केवळ औपचारिकता असून पुढील तीन वर्षांसाठी सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा राहील हे निश्चित मानलं जात आहे. पक्षात त्यांना कोणीही आव्हान देण्याचा मन:स्थिती नसल्याने त्यांचीत बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट आहे.
सध्या अमित शहा माजी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी अध्यक्षपद सोडलं होतं. त्यामुळे पदाची जबाबदारी शाह यांच्या खांद्यावर देण्यात आली होती.