सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवीदिल्ली (पीटीआय)- पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात २.२५ तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात १ रुपयांची वाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. या शुल्क वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर मात्र कोणताही परिणाम होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला तेलावर अबकारी कर प्रति लिटर ३ रुपयांपेक्षाही कमी आहे. जकात कर तर तेलावर अजिबातच नाही. या पाश्र्वभूमीवर मोदी सरकारचा तेलावरील करआकारणी वाढवण्याचा हा निर्णय घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात अतोनात वाढ होत गेली. यामुळे जनमताचा क्षोभ टाळण्यासाठी सिंग सरकारपुढे तेलदरात कपात करण्याखेरीज अन्य पर्याय उरला नाही. परिणामी तेलाचे दर कमी राखण्यासाठी सिंग सरकारला तेलावरील कर कमी करावे लागले. मात्र सध्याची स्थिर परिस्थिती पाहता मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला.