काळे धन लपवण्यासाठी ‘फेअर अँड लव्हली’ योजना-राहुल गांधी

0
6
नवी दिल्ली – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी मनरेगा उल्लेख नरेगा केला. त्याआधी डॉलरला रुपया म्हटले. चूक लक्षात आल्यानंतर ते म्हणाले मी आरएसएसचा नाही. माझ्याकडून चूका होत असतात.अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान, राहुल गांधी म्हणाले, ‘मोदी सरकारने काळे धन परत आणण्याची घोषणा केली होती. मात्र काळे धन लपवण्यासाठी त्यांनी ‘फेअर अँड लव्हली’ योजना आणली आहे. जेटलींकडे जा आणि काळे धन गोरे करुन घ्या.’ अशी अर्थसंकल्पाची त्यांनी खिल्ली उडवली.
राहुल गांधी म्हणाले, ‘मी चूका करतो. मला सगळेकाही माहित नसते. पहिले मी लोकांकडे जातो. त्यांच्याशी बोलतो, त्यांचे ऐकून घेतो आणि नंतर सभागृहात बोलतो
 केंद्रातील सरकार दलित, आदिवासी विरोधी, असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले, जेएनयूमधील 40 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दरमहा केवळ सहा हजार रुपये आहे. सत्ताधारी पक्षाचे धोरण आहे की दलित आदिवासींनी शिक्षण घेऊ नये.सरकारच्या दबावामुळे हैदराबादमधील रिसर्च स्कॉलर रोहित वेमुलाची आत्महत्या.

– विद्यार्थी, प्राध्‍यापकांना मारहाण झाली तेव्हा एका शब्‍दानेही पंतप्रधानांनी विरोध का केला नाही. धर्मात कुठे लिहिले आहे का की, विद्यापीठातील प्राध्‍यापक, विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण करावी. मी कन्‍हैयाचे 20 मिनीटांचे भाषण ऐकेले आहे त्‍याने एकही राष्‍ट्रविरोधी वक्‍तव्‍य केले नाही.
 ‘मोदीजी बोलालया उभे राहातात, म्हणतात मनरेगा काही कामाची नाही. अशी योजना कधीही पाहिली नाही. यूपीएच्या सरकारचे हे अपयश आहे ते लोकांच्या लक्षात राहावे यासाठी ती रद्द करणार नाही.’ ‘मोदीजी फार पॉवरफूल नेते आहेत. जिकडे जावे तिकेड त्यांचा बब्बर शेर. टीव्हीवर बब्बर शेर, इंटरनेटवर बब्बर शेर. मोदी बब्बर शेर आहेत. त्यांची भीती वाटते. पण तुम्ही लोकांनी थोडे बोलेल पाहिजे. ‘ राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान म्हणतात ‘नरेगा’सारखी योजना कधी पाहिली नाही. यावर सत्ताधारी बाकांवरुन आक्षेप घेण्यात आला.
राहुल गांधी म्हणाले, एकीकडे गांधी आहे तर एकीकडे सावरकर. एक अहिंसेचे प्रयोग करतात तर एक हिंसेचे. या वाक्यवर विरोधी बाकांवरून आक्षेप घेण्यात आला, आणि गोंधळाला सुरुवात झाली. मात्र, पीठासीन अधिकारी वेनूगोपाल यांनी सत्ताधारी पक्षातील सदस्यांना शांततेचे अवाहन केल्यानंतर राहुल यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, सावरकर तुमचे नाहीत का, ते तरी सांगा. एवढा गदारोळ करण्याचे काही कारण नाही, मी म्हणालो सावरकर तुमचे आहेत.