क्रिडा संकुलात प्रशिक्षकाविना जलतरण तलावाचा वापर

0
9

गोंदिया, दि.०३ : येथील मरारटोली परिसरात जिल्हा क्रीडा संकूल उभारण्यात आले. मात्र, त्याठिकाणी कुणाचीही देखरेख नाही. क्रिडा प्रशिक्षक उपस्थित राहत नाही. अशा अवस्थेत परिसरातील आठ वर्षे वयोगटापासून जास्तीच्या वयाची मुले जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. क्रिडा संकुलातील अनेक साहित्याची तोडफोड करण्यात आली. एकंदरित हे संकूल बेवारस स्थितीत सापडल्याने आपलीच ढिंग ढिंग हाकणार्या  येथील त्या लोकप्रतिनिधींच्या घोषणांची सुध्दा पोलखोल झाली आहे.चारपाच लोकासोबंत जाऊन फोटोशेसन करुन विकासाकामाच्या गवगवा करणार्या लोकप्रतिनिधीच्या विकासकामाचे हेच जलतरण तलाव व क्रिडा संकुल म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील खेळाडुंना खेळाचा सराव करता यावा. विविध स्पर्धा जिल्हास्थळावर एकाच ठिकाणी घेता याव्यात, याकरिता तत्कालीन आघाडी सरकारने गोंदिया येथे जिल्हा क्रीडा संकुलाला मान्यता दिली. त्याचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बांधकाम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. जलतरण तलावाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यात पाणी साठवून ठेवण्यात आले. आवारभितीचे बांधकाम पूर्ण झाले नसल्यामळे परिसरातील आठ वर्ष ते त्यापेक्षा जास्त वयाची मुले आंघोळ करण्याकरिता या जलतरण तलावात येतात. गत वर्षी एका खासगी शाळेतील जलतरण तलावात प्रशिक्षक असताना देखील दोन बालके बुडाली होती. असे असताना देखील शासकीय जलतरण तलावात बिनदिक्कतपणे कुणीही प्रशिक्षक हजर नसताना मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत. अशात एखाद्या बालकाचा बुडून जीव गेल्यास त्याला कारणीभूत कोण राहणार? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. त्याचबरोबर क्रिडा संकूल परिसरात ठिकठिकाणी साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, दारे सताड उघडीच ठेवण्यात आल्यामुळे येथील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. भंगार वेचणारे साहित्य चोरून विक्री करत आहेत. त्यामुळे क्रिडा संकुलाचा वाली कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील खेळाडुंना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्याकरिता सहा वर्षांपूर्वी येथे एका महिला प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास खेळाडुंना प्रशिक्षण द्यायचे आहे. परंतु, आजतागायत येथे प्रशिक्षक भरकटले नसल्याची खंत येथे सरावाला येणाèया खेळाडुंनी दिली. महिन्याला चाळीस हजार रुपयांच्या घरात वेतन घेणाèया प्रशिक्षकांना जिल्हा क्रिडा अधिकारी देखील जाब का विचारत नाहीत, अशी खंत खेळाडुंनी बोलून दाखविली.