‘लष्करात मनुष्यबळ कपातीची गरज’

0
6
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्र सरकार भारतीय लष्करातील मनुष्यबळ कमी करण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्वतः असे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, संरक्षण यंत्रणातील अतिरिक्त खर्च कमी करण्याची गरज आहे. संरक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्याला यासाठी महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण यंदा संरक्षण क्षेत्रात 95 हजार कोटी रुपये वेतनावर खर्च होणार आहे.
मनुष्यबळ कपाताचा निर्णय यासाठी घेतला जात आहे, कारण संरक्षण मंत्रालयाचा पेन्शन आणि वेतनावरील खर्च वाढला आहे. यावर्षी संरक्षण मंत्रालय वेतनाशिवाय 82,333 कोटी रुपये पेन्शनवर खर्च करणार आहे.
पर्रिकरांच्या म्हणण्यानूसार, वेतन आणि पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने निधीची कमतरता पडत आहे. त्यासोबतच याचा थेट परिणाम मिलिटरीतील अधुनिकतेवर होत आहे. मंत्र्यांनी सांगितले,’लष्कराचे असे क्षेत्र शोधण्यास सांगण्यात आले आहे, जेथील खर्च कमी करता येईल. ते म्हणाले, ‘उदाहरणार्थ, आधी लष्करात प्रत्येक ठिकाणी टेलिफोन ऑपरेटर होते, मात्र आता आधुनिकीकरणामुळे एवढ्या टेलिफोन ऑपरेटर्सची गरज नाही. यामुळे मनुष्यबळाची कपात होईल आणि बचत होईल.’