कर्नल पुरोहिताविरुद्ध पुरावा नाही

0
11
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना एनआयएचे महासंचालक शरद कुमार म्हणाले, ‘समझौता बॉम्बस्फोट प्रकरणी पुरावा उपलब्ध नाही. मला एक कळत नाही की पुरोहितांचे नाव या प्रकरणाशी का जोडण्यात आले?‘ मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने पुरोहितांवर केले होते. या प्रकरणात एनआयए पुढील तपास करत आहे. एनआयएने या प्रकरणी आठ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये नाबा कुमार ऊर्फ स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान, अमित, राजेंद्र चौधरी यांच्यासह फरार असलेले रामचंद्र आणि संदीप डांगे यांचाही समावेश आहे. शिवाय मृत पावलेले सुनील जोशी उर्फ सुनीलजी यांचाही त्यामध्ये समावेश होता.