बांडेनगरच्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

0
6

गडचिरोली, -भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत बांडेनगर जंगलात झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. सरिता असे मृत नक्षलीचे नाव असून, ती पेरमिली दलमची उपकमांडर असल्याचे समजते.

 ताडगाव पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एका महिला नक्षलीचा मृतदेह आढळून आला. शिवाय एक एसएलआर व अन्य साहित्यही आढळून आले. पोलिसांनी बांडेनगर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे.