यूपीएससीचा निकाल- योगेश कुंभेजकर महाराष्ट्रातून पहिला,सिदेंवाहीचा नितेश पाथोडे ७२३वा

0
13

नवी दिल्ली, दि. 10- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत टीना दाबी हिनं पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर योगेश कुंभेजकर हा महाराष्ट्रातून अव्वल आला आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2015च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत दिल्लीतल्या टिना दाबी हिनं पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर योगेश कुंभजेकर हा महाराष्ट्रातून अव्वल आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल  www.upsc.gov.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला जवळपास 1,078 विद्यार्थी बसले होते. यातील 499 विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील होते. तर 314 जण हे मागास वर्गीयांतून परीक्षेला बसले होते. 176 अनुसूचित जातीतून तर 89 अनुसूचित जमातीतून परीक्षेला बसले होते. या परीक्षेत जम्मू-काश्मीरमधला अथर आमीर उल साफी खान या दुसरा आला. जसमीत सिंग सिंधू तिसरी आली आहे. आयोगानं 172 जणांची यादी आरक्षित केल्याची माहिती दिली आहे. हा निकाल 2015ला झालेल्या लेखी परीक्षेच्या निकषांवर लावला असल्याचीही माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना अनेक सरकारी सेवेतील दारं खुली झाली आहेत.  

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील प्रा.हरिभाऊ पाथोडे यांचा मुलगा नितेश पाथोडे यानेही युपीएससीच्या परिक्षेत  भारतातून ७२३वा आला.कठीण परिश्रमाला यश मिळाले.नितेशचे वडील प्रा.हरिभाऊ पाथोडे हे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संघटक आहेत.तसेच ओबीसी समाज संघटनेचेही पदाधिकारी आहेत.नितेशच्या यशाबद्दल ओबीसी संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेला विद्यार्थी योगेश विजय कुंबेजकर हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या कुंभेजला वास्तव्याला आहे. योगेश कुंभेजकर याचे १ ली ते ४ थीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या नुमवि प्रशालेत झाले.  त्यानंतर त्याचे ५ ते १० पर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे झाले. ११ आणि १२ वीचे शिक्षण पुणे येथील एस पी कॉलेज येथे झाले. १२वी नंतर आयआयटी पवई येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा कोर्स पूर्ण केला. याचवेळी जिल्हा बँकेत एका वरिष्ठ अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने योगेश याने डीसीसी बँकेत ६ महिने नोकरी केली़. याचवेळी आपल्याला आयआयएस व्हायचे हे ठरवून त्यांनी पुन्हा अभ्यासास सुरुवात केली़. २ वर्ष त्याने अथक परिश्रम घेऊन अभ्यास केला. यूपीएससीच्या पहिल्या वर्षी परीक्षा देऊन मुलाखत दिली़. त्यात योगेशला १४३ वी श्रेणी मिळाली होती़. त्यानंतर हैदराबाद येथे ट्रेनिंग घेतले. ६ मे रोजी झालेल्या मुलाखतीचा आज निकाल लागला. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरा आलेला विद्यार्थी हणमंत कोंडिबा झेंडगे हा देखील सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील भांबेवाडीतला रहिवासी आहे. तो महाराष्ट्रातून दुसरा तर देशातून 50 वा क्रमांक पटकावून यशस्वी झाला आहे.