शशांक मनोहर यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा

0
14
नागपूर, दि. १० – शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऑक्टोंबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा दुसरा कार्यकाळ होता.
शशांक मनोहर यांना आयसीसीचे अध्यक्षपद भूषवायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार आयसीसी अध्यक्ष स्वतंत्र असला पाहिजे. आयसीसीच्या अध्यक्षपदावर असताना देशाच्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवात येत नाही. त्यामुळे मनोहर यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे.