केरळमध्ये राष्ट्रवादीने जिंकल्या 2 जागा

0
5
वृत्तसंस्था
तिरुअनंतपूरम, दि. 19 – केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे डाव्याच्या एलडीएफ आघाडीने बाजी मारली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी  झाले आहेत. 140 सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना 85 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. कुट्टनाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस चांडी यांनी 4891 मतांनी विजय मिळवत काँग्रेस उमेदवार अडव्होकेट जेकब इब्राहम यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए के ससींद्रन यांनी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) किशन चंद यांचा 29057 मतांनी पराभव केला आहे.