मनीष शिसोदियासह आपचे ५२ आमदार पोलिसांच्या ताब्यात

0
10

नवी दिल्‍ली – दिल्‍लीमध्‍ये भाजप आणि आम आदमी पक्षातील (आप) संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शनिवारी ‘आप’चे आमदार दिनेश मोहनिया यांना अटक केल्‍यानंतर रविवारी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदियांसह 52 आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्‍यात घेऊन सोडले. हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या घरी सरेंडर करण्‍यास जात होते.पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदियासह आपच्या ५२ आमदारांना दिल्ली पोलिसांनी तुघलक रोडवर ताब्यात घेतले आहे. दरम्यान ‘आप’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ रेसकोर्स परिसरात जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.
मनीष सिसोदीया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया व आमचे आमदार आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर शरणागती पत्करणार असल्याचे म्हटले होते.