NSGचं सदस्यत्व मिळालं तर नुकसानच – यशवंत सिन्हा

0
12

नवी दिल्ली, दि. २६ : अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न असताना त्यांना पक्षातूनच विरोध होत आहे. भारताला ‘एनएसजी’कडे याचना करण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत NSGचं सदस्यत्व मिळालं तर नुकसानच आहे. असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी माध्यमांशी बोलताना केले. मोदी सरकारचे पाकविषयीचे धोरण पूर्णत: फसले आहे. जितक्या लवकर हे धोरण बदलले जाईल, तितके ते हिताचे आहे असेही ते म्हणाले.

भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ देशांनी भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला होता. एनएसजीच्या ४८ सदस्यीय समूहात सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली होती; पण चीनचा विरोध कायम राहिल्याने यात यश मिळू शकले नाही.’एनएसजी’ प्रवेशासंदर्भात भारत चीनसोबत सातत्यानं चर्चा करत राहणार आहे. यामध्ये आम्हा यश येईल. अण्वस्त्र प्रसाराच्या मुद्द्यावर भारताची पाकिस्तानशी तुलना होऊच शकत नाही.