पोलिस-नक्षल चकमकीत सीआरपीएफचा जवान जखमी

0
12

गडचिरोली,ता.२६: एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
केंद्रीय राखीव दल व जिल्हा पोलिस आज संयुक्तपणे हेडरी परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. त्यात सीआरपीएफच्या १९१ बटालियनचे जवान श्री.मुलचदं हे जखमी झाले. त्यांना नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे.