केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा राजीनामा

0
7

वी दिल्ली, दि. 12 – मोदी सरकारमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठे फेरबदल करण्यात आले. काही नव्या मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेशही करण्यात आला. पण मंत्रिमंडळ विस्ताराला काही दिवस नाही तोपर्यंत दोन केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवला असून, राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
तसेच केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वरा यांनीही दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. विशेष म्हणजे नजमा हेपतुल्ला यांनी 2015-16च्या बजेटमध्ये 98 टक्के खर्च अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांवर केला होता. नजमा हेपतुल्ला यांची जागा रिकामी झाल्यानं त्यांच्या खात्याचा स्वतंत्र कार्यभार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींकडे सोपवण्यात आला आहे.