योगिता पिपरे यांना भाजपची नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर

0
21
Exif_JPEG_420

गडचिरोली, दि.२३: येथील नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असताना आज भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे यांच्या अर्धांगिनी योगिता पिपरे यांना नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याची पत्रकार परिषदेत करुन सर्व शंकाकुशंकांवर पडदा टाकला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांनी आज सकाळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून योगिता पिपरे यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय संपूर्ण प्रभागातील नगरसेवकपदासाठीच्या अधिकृत उमेदवारांची नावेही खा.नेते यांनी जाहीर केली. खा.नेते म्हणाले, भाजपने नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उमेदवारांची निवड करताना लोकशाही मार्गाने प्रक्रिया पार पाडली. सुरुवातीला पक्षाने वॉर्डनिहाय बैठका घेऊन नागरिकांकडून संभाव्य उमेदवारांची माहिती मागितली. त्यानंतर त्यांच्या मुलाखती घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चाही केली. शिवाय ‘राजकारणे मीडिया वेब प्रा.लि.’ यांच्याकडून सर्वेक्षणही करवून घेतले आणि सर्वांच्या सहमतीने नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावे निश्चित केली.

यंदा गडचिरोलीचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून, या पदाची अधिकृत उमेदवारी योगिता प्रमोद पिपरे यांना जाहीर करण्यात आली. नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ म.ज्योतिबा फुले प्रभागातून अनुसूचित जाती(सर्वसाधारण)-सिद्धार्थ गजानन नंदेश्वर, तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेच्या जागेवर अरुणा रामदास दिवटे यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २ लांझेडा प्रभागातून नामाप्रच्या जागेवर अनिल पांडुरंग कुनघाडकर, तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर वर्षाताई अरविंद नैताम यांना अधिकृत उमेदवारी बहाल करण्यात आली. प्रभाग क्रमांक ३ स्नेहनगर प्रभागात नामाप्रच्या जागेवर प्रवीण पुंडलिकराव वाघरे, तर सर्वसाधारण महिलेच्या जागेवर रितू रुपेश कोलते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रभाग क्रमांक ४ रामनगरमध्ये अनुसूचित जमाती- गुलाबराव गणपत मडावी, सर्वसाधारण महिला-अनिता अविनाश विश्रोजवार, प्रभाग क्रमांक ५-छत्रपती शाहूनगरमधून अनुसूचित जाती(महिला)-लता देवाजी लाटकर, सर्वसाधारण-प्रकाश वसंत निकुरे, प्रभाग क्रमांक ६- कॅम्प एरियामध्ये नामाप्र(महिला)-अल्का अनिल पोहनकर व सर्वसाधारण-प्रवीण वामनराव देशमुख, प्रभाग क्रमांक ७ गणेशनगरमधून अनुसूचित जाती(महिला)-निमा नेमाजी उंदिरवाडे, अनुसूचित जमाती(सर्वसाधारण)-भूपेश उमाशंकर कुळमेथे, प्रभाग क्रमांक ८ म.गांधी प्रभागमधून नामाप्र(महिला) जागेवर मंजुषा नामदेवराव आखाडे व सर्वसाधारण-आनंद नामदेवराव शृंगारपवार, प्रभाग क्रमांक ९ हनुमाननगर प्रभागातून नामाप्र-वैष्णवी विलास नैताम, सर्वसाधारण-मुक्तेश्वर पुंजाराम काटवे, प्रभाग क्रमांक १० विसापूरमधून अनुसूचित जमाती(महिला)-गीता उमेश पोटावी, नामाप्र-केशव नामदेवराव निंबोळ, प्रभाग क्रमांक ११ सोनापूरमध्ये अनुसूचित जमाती(महिला)-रंजना शंभुविधी गेडाम, सर्वसाधारण-संजय गोपाळराव मेश्राम, प्रभाग क्रमांक १२ गोकुळनगरमधून अनुसूचित जाती(सर्वसाधारण)-नितीन नारायणराव उंदिरवाडे, नामाप्र(महिला)-पूजा दुर्योधन बोबाटे, तर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर वर्षा वासुदेव बट्टे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.