तोंडी तलाक’वर निवडणुकीनंतर मोठा निर्णय

0
9

गाझियाबाद वृत्तसंस्था दि. 6- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार तोंडी तलाक पद्धतीवर बंदी आणण्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे, केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.तोंडी तलाक ही मुस्लिम समाजातील परंपरा स्त्रियांचा अनादर करणारी आहे व त्यावर बंदी घालणे गरजेचे आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. भाजप सरकार वाईट सामाजिक प्रथा नष्ट करण्यासाठी बांधील आहे. महिलांचा सन्मान करणारा आमचा एकमेव पक्ष आहे. इतर पक्षांमध्ये स्त्रियांना चांगले स्थान नाही व त्यांच्याबद्दल आदर ही नाही, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, याठिकाणी मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजपने याविषयी निवडणुकीनंतर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तोंडी तलाक पद्धतीला मुस्लिम लॉ बोर्डाचा पाठिंबा आहे.