उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या पत्रपरिषदेत गोंधळ

0
8

पत्रकारांचा बहिष्कार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी
दिल्लीचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या येथे सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत जोरदार गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले. या मागच्या कारणाचा शोध घेतला असता सचिवालयात प्रवेशबंदी केल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या पत्रपरिषदेवर बहिष्कार घातल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी केजरीवाल सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. त्याबाबत माहिती देण्यासाठी सिसोदिया यांनी ही पत्रपरिषद आयोजित केली होती. तिला हजर राहण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी तेथे जाताच त्यांना सचिवालयात प्रसार माध्यमांना प्रवेशबंदी असल्याचे सांगण्यात आले. यावरून संतापलेल्या पत्रकारांनी याबाबतची तक्रार सिसोदिया यांच्याकडे केली. मात्र, गोंधळ व धक्काबुक्कीपासून बचाव करण्यासाठी सिसोदिया कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तेथून निघून गेले.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आले की, आम आदमीने सचिवालयात येण्याची गरज नसून सरकारच स्वत: आम आदमीजवळ जाईल. तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीही आधी वेळ घेऊन सचिवालयात भेटीला येण्याचे सांगण्यात आले.