माजी गृहमंत्री यांच्या निधनामुळे 17 फेबुवारीचे प्रफुल पटेलांचे कायर्क्रम रद्द

0
13

गोंदिया : खासदार प्रफुल पटेल हे उद्या १७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार होते.परंतु महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे आज सोमवारी दिर्घ आजाराने निधन झाल्याने गोंदिया व भंडारा जिल्ह्यात खासदार प्रफुल पटेल यांचे आयोजित सर्व कायर्क्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कायार्लयाने दिली आहे.खासदार पटेल यांचे 18 फेबुवारीचे कायर्कम पुवर्वत राहणार असल्याचेही कळविले आहे. १८ फेब्रुवारी रोजी चांदपूर,गायमुख,प्रतापगड येथे भेट देणार आहेत.गोरेगाव तालुक्यातील हिराटोला येथे मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाला उपस्थित राहतील.दुपारी २ वाजता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे आदिवासी समाज जागरण मेळाव्याला उपस्थित राहून क्रांती सुर्य भगवान बिरसा मुंडा पुर्णाकृती पुतळ्य़ाचे अनावरण करतील. तर दुपारी ३ वाजता हेलीकॉप्टरने भंडारा करिता रवाना होणार आहेत.

मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरपला-खासदार पटेल
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर पाटील यांच्या निधनाची दुख:द बातमी ऐकून मला विश्वास बसत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आजाराशी लढा देत होते. त्यांच्या जुन्या अनेक आठवणी आहेत. मनमिळाऊ व्यक्तिमत्व आणि सदैव तत्पर राहणारे,कुणावरही राग न करणारे हसरे व्यक्तिमत्व होते. उत्तम वक्ता, सभागृहात प्रश्न मांडणारा प्रभावी नेता. माझा जवळचा मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले आहे.सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, हे आबांनी कायम पाहिले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपरिमित हाणी झाली असून ती भरुन निघणे कठिण असल्याची प्रतिक्रिया खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

आबा पाटल्यांच्या निधनाने सभागृहातील सच्चा व सामान्यांच्या हितासाठी विचार करणारा व्यक्तीमत्व हरपला.गावातील प्रत्येकाला पोलिसविभागाने न्याय द्यावे त्यांना अडचण जाऊ नये ही मनात भावना ठेवणारे गृहमंत्री होते.त्यांनी आपल्या काळात केलेल्या सामाजिक कायार्मुळेच महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर गेला.स्वच्छतेबाबती जनजागृतीला प्रोत्साहन देणारा उमदा नेतृत्व गेल्याने महाराष्ट्राची हाणी झाल्याची प्रतिक्रिया भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील साहेबांच्या निधनाने आमच्या पक्षालाच नव्हे तर महाराष्टातील राजकीय क्षेत्राचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे.मनमिळाऊ आणि कुठल्याही पदाचा हाव न बाळगणारे असे व्यक्तिमत्व आबा होते,त्यांच्या राजकीय कारकिदर्ीचा लाभ आम्हाला नेहमीच सभागृहात मिळायचा आज त्यांच्या निधनाने ती पोकळी भरुन निघणे कठीण असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केली.