माजी मंत्र्याच्या मुलाचा शाही विवाह सोहळा

0
5


राजस्थानमधील माजी कॅबिनेटमंत्री आणि सीरवी समाजाचे धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मगुरू दिवान माधोसिंग यांचा जेष्ठ मुलगा डॉ.लक्ष्मण सिंगचा लग्नसोहळ हा मोठय़ा थाटात पार पडणार आहे.

बिलाड- राजस्थानमधील माजी कॅबिनेटमंत्री आणि सीरवी समाजाचे धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मगुरू दिवान माधोसिंग यांचा जेष्ठ मुलगा डॉ. लक्ष्मण सिंगचा लग्नसोहळा हा मोठ्या थाटात पार पडणार आहे.
यासाठी बिलाडा परिसरातील सर्व नागरिक कामाला लागले आहेत. लग्नासाठी येणा-या पाहुण्यांच्या स्वयंपाकासाठी २० हजार किलो तुपाचा वापर करण्यात येणार आहे. लग्नाच्या तीन दिवसापूर्वीच स्वयंपाकाच्या कामासाठी २०० लोक राबत आहेत.
खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ट्रक बिलाडच्या दिशेने आले आहेत; तयार करण्यात येणारी पदार्थ मोठमोठय़ा हॉलमध्ये ठेवण्यात येत आहेत. लग्नासाठी बिलाडा परिसरातील सर्व गावातील नागरिकांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. लक्ष्मणसिंग यांच्या मुलाच्या लग्नासाठी एक लाख लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये आजी-माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.
५० एकरची पार्किंग
लग्नासाठी येणा-या पाहुण्यांच्या गाडय़ा लावण्यासाठी ५० एकर जमिनीवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मागवण्यात आलेल्या वस्तू
२०००० किलो शुद्ध तूप
२०००० किलो तेल
१४००० किलो बेसन पीठ
३५०० किलो दही-दूध
४०० किलो काजूगर